सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयातील एन. एस. एस. विभागाच्या वतीने दिनांक 05/ 10/ 2023 रोजी गुरुवार सकाळी ठीक 10: 00 ते 4: 00 वाजता या वेळात राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती, तसेच सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.व्यंकटरावजी नेमन्नीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयीन प्रांगणात शासकीय रक्तपेढी संकलन केंद्र नांदेड च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरीही सदर रक्तदान शिबिरास स्वतः तसेच इतर आप्त स्वकीय इच्छुक व्यक्तींचा सहभाग नोंदवून शिबिरास सहकार्य करावे.
सर्व रक्तदात्याना सहभाग प्रमाणपत्र तसेच शासकीय रक्तपेढी संकलन केंद्रातर्फे बॅच(टोकण) कार्ड देण्यात येणार आहे.